◼️ Blackboard Chalk Art

◼️ *फलक रेखाटन*  ◼️
दि.६ डिसेंबर २०१९. *महामानव, उद्धारकर्ते,परमपूज्य,बोधिसत्व,घटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन म्हणजेच महापरिनिर्वाण दिन.*
   *१ ते ७ डिसेंबर दरम्यान  भारतभरातून ,विदेशातून २५ लाखाहून अधिक भीमअनुयायी मुंबईतील समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमीवर या आपल्या महामानवास अभिवादन करण्यासाठी एकवटतात.
   *परिनिर्वाण म्हणजे बौद्ध धर्मातील सर्वात महत्वाचं तत्व आणि ध्येय होय. परिनिर्वाण या शब्दाचा अर्थ मृत्यू नंतर निर्वाण म्हणजेच मुक्ती असा होतो. निर्वाण स्थितीमध्ये पोहचल्यानंतर पुनर्जन्माचा विषय संपतो. जी व्यक्ती सात्विक,शुद्ध,आयुष्य जगतात त्यांना ही स्थिती प्राप्त होते.भगवान गौतम बुद्ध हे मूळ महापरिनिर्वाण होय.*
   फलक रेखाटनातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवास विनम्र अभिवादन !
  - *देव हिरे.(कलाशिक्षक, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि. नाशिक.)*

Comments