मराठी राजभाषा दिन,फलक रेखाटन- देव हिरे.

◼️ *फलक रेखाटन* ◼️
दि. २७ फेब्रुवारी २०२०.
🚩 *मराठी राजभाषा दिन* 🚩उत्सव मराठीचा 🚩
 *।।माझ्या मराठीचा संग, तिला तुक्याचा अभंग, तिच्या अबीराचा रंग, काय वर्णावे ।।*
   मराठी भाषेतील अग्रगण्य कवी,लेखक,नाटककार,कथाकार,व समीक्षक *विष्णू वामन शिरवाडकर.(कुसुमाग्रज) यांचा आज जन्मदिन.* हे मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे दुसरे साहित्यिक. यांचा जन्मदिवस हा *'मराठी राजभाषा दिन'* म्हणून साजरा होतो.  
  मराठी समस्त महाराष्ट्राची मायबोली. *माय मराठी भाषा आमची,नाद मराठी साद मराठी, नात्यांमधला आस्वाद मराठी, स्नेह मराठी भाव मराठी,शब्द घेतो ठाव मराठी.*
    ज्या भाषेने आम्हाला विचार करायला शिकवलं,लिहायला वाचायला शिकवलं,जगण्याची कला शिकवली. *अशा माय मराठी चा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा.*  चला  मायबोली मराठीचा सन्मान व गौरव करूया,,,!! *मराठी आमचा कणा,,अन,,मराठी आमचा बाणा.*  मराठी जगूया,,रुजवूया,,सजवूया,,फुलवूया,,व जपूया,,!  🚩 *मराठी राजभाषा दिनाच्या फलक रेखाटनातून म्हऱ्हाठमोळ्या शुभेच्छा,,!* (फलक रेखाटन- देव हिरे. कलाशिक्षक,नू.मा.वि.भाटगाव.ता.चांदवड.जि.नाशिक.)

Comments