Posts

Pencil Sketch,,,,, Big B,,,, by Shubham Hire. (chandwad, Tal. Chandwad. Dist. Nashik)

Image

जागतिक महिला दिन ८ मार्च ,फलक लेखन,रेखाटन-देव हिरे.

Image
◼️ *फलक लेखन, रेखाटन* दि. ८ मार्च २०२०. *जागतिक महिला दिन* 'जागर स्त्री शक्तीचा ,जागर स्त्री कर्तृत्वाचा' *सन्मान समस्त महिलांचा.*    आज ८ मार्च हा दिवस संपूर्ण जगात तसेच भारतात *'महिला दिन'* म्हणून साजरा केला जातो. जगात ज्या ज्या क्षेत्रात महिलांना संधी मिळाली त्या त्या क्षेत्रात तिने आपलं वेगळंपण सिद्ध केलं. तिचं कर्तृत्व अफाट आहे. *धर्म रूढी परंपरा व पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये ही तिने आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं.*    विशेष कार्य करणाऱ्या उच्च पदस्थ,नोकरदार,शहरातील सुशिक्षित महिलांचा व साहेब वर्गाचा आज सन्मान होईलच पण यांची जाळं-मुळं ग्रामीण भागात आहेत. *मग ती कुणाची आजी,कुणाची आई,मावशी,आत्या,पत्नी,बहीण आहे.जी आजही या सन्मानापासून उपेक्षित आहे.* शेतात,किंवा चार भिंती आड सतत कष्ट करत आहे.तिचा देखील आज सन्मान व्हायलाच हवा.    *ही ग्रामीण स्त्री धगधगत्या ज्वालांवर संसार मांडते आणि भविष्यातील सुखाचं गणित लेकरांच्या नशिबात पहाते. तिच्या आयुष्यात नेहमीच कष्ट आहेत.पण आपल्या लेकरांना कष्ट पडूनये हेच विचार तिच्या हृदयी आहेत.* घर,घरातील म...

मराठी राजभाषा दिन,फलक रेखाटन- देव हिरे.

Image
◼️ *फलक रेखाटन* ◼️ दि. २७ फेब्रुवारी २०२०. 🚩 *मराठी राजभाषा दिन* 🚩उत्सव मराठीचा 🚩  *।।माझ्या मराठीचा संग, तिला तुक्याचा अभंग, तिच्या अबीराचा रंग, काय वर्णावे ।।*    मराठी भाषेतील अग्रगण्य कवी,लेखक,नाटककार,कथाकार,व समीक्षक *विष्णू वामन शिरवाडकर.(कुसुमाग्रज) यांचा आज जन्मदिन.* हे मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे दुसरे साहित्यिक. यांचा जन्मदिवस हा *'मराठी राजभाषा दिन'* म्हणून साजरा होतो.     मराठी समस्त महाराष्ट्राची मायबोली. *माय मराठी भाषा आमची,नाद मराठी साद मराठी, नात्यांमधला आस्वाद मराठी, स्नेह मराठी भाव मराठी,शब्द घेतो ठाव मराठी.*     ज्या भाषेने आम्हाला विचार करायला शिकवलं,लिहायला वाचायला शिकवलं,जगण्याची कला शिकवली. *अशा माय मराठी चा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा.*  चला  मायबोली मराठीचा सन्मान व गौरव करूया,,,!! *मराठी आमचा कणा,,अन,,मराठी आमचा बाणा.*  मराठी जगूया,,रुजवूया,,सजवूया,,फुलवूया,,व जपूया,,!  🚩 *मराठी राजभाषा दिनाच्या फलक रेखाटनातून म्हऱ्हाठमोळ्या श...

✍️✍️ Pencil Sketch,,,,

Image
 ✍️ * पेन्सिल स्केच * ✍️ 🔷 * जागतिक रंगभूमीवरच्या  नटसम्राटाला विनम्र आदरांजली * 🔷   दि.१७ डिसेंबर २०१९ रोजी मराठी ,हिंदी सिनेमात ,नाटकात,आपली वेगळी मुद्रा उमटवणाऱ्या जेष्ठ अभिनेते,दिग्दर्शक * डॉ. श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. *    * डॉ. श्रीराम लागू म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठ जुन्या ते नवीन काळाचा दुवा,एक संवेदनशील कलावंत, आपल्या अभ्यासू अभिनयातून विचार व व्याकरण सिद्ध करणारे अभिनेते. अभिनयाची वेगळी पठणी असलेले नट. आदर्श एकटिंग काय असावं याचं उत्तम उदाहरण. *    * नटसम्राट, सूर्य पाहिलेला माणूस, मित्र,उध्वस्त धर्मशाळा, या नाटकातून तसेच पिंजरा या चित्रपटात त्यांची अजरामर भूमिका कायम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल. *    * लमाण हे त्यांचं आत्मचरित्र २००४ मध्ये प्रसिद्ध झाले.१९६७ मध्ये कालिदास सन्मान पुरस्कार,१९७८ मध्ये फिल्मफेअर पुरस्कार, २०१० मध्ये संगीत नाटक अकादमी फेलोशिप असे सन्मान प्राप्त होते. *    अनेक मराठी ,हिंदी चित्रपटात अनोख्या भूमिका करणाऱ्या या * रंगभूमीवरच्या ...

Blackboard Chalk Art.

Image
◼️ * फलक रेखाटन * ◼️( Face in one color chalk, monochrom medium )  दि. १५ डिसेंबर २०१९. * सरदार वल्लभभाई पटेल पुण्यतिथी *    * स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री,स्वतंत्रता आंदोलनात अग्रगण्य असणारे लोहपुरुष,कणखर व्यक्तिमत्व. स्वतंत्र भारतीय लढ्यात बारडोली सत्याग्रहात प्रमुख असणारे वल्लभभाई पटेल. बारडोली सत्याग्रहा नंतर संपूर्ण जनता त्यांना सरदार म्हणून ओळखायला लागली.सरदार म्हणजे प्रमुख. भारतीय एकतेचे सूत्रधार म्हणूनही त्यांना ओळखले जाते. लंडन येथे बॅरिस्टर पदवी घेऊन पेशाने वकिली व्यवसाय असणाऱ्या वल्लभभाई पटेल यांचे निधन १५डिसेंबर १९५० मुंबई येथे झाले. त्यांना मरणोपरांत १९९१ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भरातरत्न दिले गेले. *     * "सरदार" पटेल यांचे व्यक्तिमत्व लोहपुरुषास साजेसे होते. *   * या महान विभूतीस रंगीत खडू माध्यम फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन !! *     * फलक रेखाटन * - देव हिरे.(कलाशिक्षक, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि. नाशिक.) 8275586877

◼️ Blackboard Chalk Art

Image
◼️ * फलक रेखाटन *  ◼️ दि.६ डिसेंबर २०१९. * महामानव, उद्धारकर्ते,परमपूज्य,बोधिसत्व,घटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन म्हणजेच महापरिनिर्वाण दिन. *    *१ ते ७ डिसेंबर दरम्यान  भारतभरातून ,विदेशातून २५ लाखाहून अधिक भीमअनुयायी मुंबईतील समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमीवर या आपल्या महामानवास अभिवादन करण्यासाठी एकवटतात.    * परिनिर्वाण म्हणजे बौद्ध धर्मातील सर्वात महत्वाचं तत्व आणि ध्येय होय. परिनिर्वाण या शब्दाचा अर्थ मृत्यू नंतर निर्वाण म्हणजेच मुक्ती असा होतो. निर्वाण स्थितीमध्ये पोहचल्यानंतर पुनर्जन्माचा विषय संपतो. जी व्यक्ती सात्विक,शुद्ध,आयुष्य जगतात त्यांना ही स्थिती प्राप्त होते.भगवान गौतम बुद्ध हे मूळ महापरिनिर्वाण होय. *    फलक रेखाटनातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवास विनम्र अभिवादन !   - * देव हिरे.(कलाशिक्षक, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि. नाशिक.) *